महाराष्ट्र

नारायणगाव येथील विनोद सेल्स कॉर्पोरेशन कंपनीच्या कोहिनूर ब्रँडचा बनावट लोगो वापरून आटा चक्की विकणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा

एकूण 14,97,500 / -रू.च्या आटा चक्की जप्त

नारायणगाव : (दि.8 जुलै) येथील विनोद सेल्स कार्पोरेशन ने सन 2019 साली रजिस्टर केलेल्या कोहिनूर ब्रण्ड बरोबर रजि.व कपीराईट केलेले असुन कोहिनूर ब्रण्डच्या आटा चक्क्या विकण्याचा अधिकार फक्त विनोद सेल्स कॉर्पोरेशन यांनाच असताना कोहिनूर ब्रण्डच्या नावाखाली एका दुकानदाराने आटा चक्की बनवुन त्यावर कोहिनूर ब्रॅंडचा बनावट लोगो वापरून विक्री करत असल्याने त्यासंदर्भात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करूनत्यांच्याकडून एकूण 14,97,500 / -रू.च्या आटा चक्की जप्त करण्यााआल्या आहेत.अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
यााप्रकरणी सुधीर प्रकाश गडाख वय 37 वर्षे व्यवसाय गडाख मशिनरीज राहणार संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या दुकानदारावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पराग अशोक कुमार शहा ( वय 42 वर्ष) व्यवसाय एग्रीकल्चर मशिनरीज व डोमेस्टिक कोहिनूर फ्लोअर मिल , राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी दिली .
पराग शहा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, विनोद सेल्स कर्पोरेशनचे मालक श्रीमती हर्षलता अशोक शहा यांनी आम्हाला अधिकार पत्रादवारे विनोद सेल्स कॉर्पोरेशन चालविण्याचे संपुर्ण अधिकार दिले आहेत.त्यानुसार आम्ही सन 2019 साली रजिस्टर केलेल्या कोहिनूर ब्रण्ड बरोबर रजि.व कॉपीराईट केलेले असुन कोहिनूर ब्रँडच्या आटा चक्क्या विकण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे.तसेच आमच्या कोहिनूर ब्रण्डच्या नावाखाली दुसरे कोणीही अशा आटा चक्की बनवुन त्यावर आमचा कोहिनूर ब्रँडचा लोगो वापरून विक्री केल्यास त्यासंदर्भात कॉपीराईट संदर्भात तक्रार करण्याचे अधिकार मला आहेत.दिनांक 07/07/2021 रोजी मी व माझे भाउ श्री . सुहास अशोककुमार शहा वय 45 वर्षे असे आम्हास खात्रीशीर माहिती मिळाल्याने , मी नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील गडाख मशिनरीज हे आमच्या कोहिनूर ब्रँडचे बनावट नाव व लोगो लावुन बॉक्स टाईप आटा चक्कीची विक्री करीता ठेवले असल्याचे समजल्याने मी पोलीस मदत व कारवाई करीता पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना अर्ज केला होता.नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक पी.वाय.ताटे हे व पोलीस स्टाफ माझे मदती करीता माझे सोबत दोन पंचांना पोलीस ठाणेस बोलावुन त्यांना हकिकत सांगुन पंचनामा करणेकामी हजर रहा वगैरे कळविल्याने व त्यांनी पंच म्हणुन हजर राहणेस संमती दर्शविल्याने पोलीस , पंच यांचेसह मी व माझे भाउ श्री.सुहास अशोककुमार शहा वय 45 वर्षे असे गडाख मशिनरीज वारूळवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथे जावुन सदर दुकानामध्ये हजर असलेल्या इसमास आमची ओळख सांगुन छाप्याचा उद्देश सांगितला व त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सुधीर प्रकाश गडाख वय 37 वर्षे व्यवसाय गडाख मशिनरीज रा . संगमनेर ता.संगमनेर जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले .
सदर दुकानात असलेल्या कोहिनुर आटा चक्क्यांची मी पंचांसमक्ष पाहणी केली असता त्या आटा चक्क्यांवर आमचे कोहिनूर कंपनीचे बनावट नाव लावलेले मिळुन आले त्याबाबत त्यास मी कोहिनूर ब्रँड कॉपीराईट करून घेतलेला असुन कोहिनूर बँडच्या आटा चक्क्यांच्या विक्रीचा अधिकार मला असल्याचे सांगुन तुम्ही आटा चक्क्यांना कोहिनूर नाव लावुन त्यांची विक्री कशी करता असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन आटा चक्क्यांवर असलेल्या कोहिनूर नावासंदर्भात कोणतेही कागदपत्रे दाखविली नाहीत.गडाख मशिनरीज मध्ये मिळुन आलेल्या कोहिनूर असे बनावट नाव लावलेल्या आटाचक्क्यांचे वर्णन खालीलप्रमाणे – 1 ) 3,04,000 / – रू.त्यात बॉक्समध्ये व मोकळया असलेल्या कोहिनूर असे बनावट नाव लावलेल्या 2 एच.पी.च्या वेगवेगळया रंगाच्या एकुण 32 आटा चक्क्या प्रत्येकी 9500 / -रू.किंमतीच्या .2 ) 11,22,000 / – रू.त्यात बक्समध्ये व मोकळया असलेल्या कोहिनूर असे बनावट नाव लावलेल्या 1 एच.पी.च्या वेगवेगळ्या रंगाच्या एकुण 132 आटा चक्क्या प्रत्येकी 8500 / -रू.किंमतीच्या .3 ) 71,500 / – रू.त्यात बक्समध्ये असलेल्या कोहिनूर असे बनावट नाव लावलेल्या 1 एच.पी.च्या वेगवेगळ्या रंगाच्या एकुण 11 आटा चक्क्या प्रत्येकी 6500 / रू.किंमतीच्या . एकुण 14,97,500 / -रू.येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या व किंमतीच्या आटा चक्क्या त्यास कोहिनूर नावाचा बनावट नाव व लोगो लावुन दुकानामध्ये विक्री करीता ठेवलेल्या असताना त्या प्रत्येक्षात मिळुन आल्या. त्या सहा.पोलीस निरीक्षक पी . वाय.ताटे यांनी माझे कडुन खात्री करून पंचनाम्याने जप्त केल्या आहेत.
कोहिनूर कंपनीचे लोगो व नाव वापरण्याचे आधिकार फक्त मला असताना दिनांक 07/07/2021 रोजी 5.40 ते 7.40 वा.चे दरम्यान मौजे वारूळवाडी ता.जुन्नर जि.पुणे गावचे हद्दीतील गडाख मशिनरीज् या दुकानांमध्ये इसम नामे सुधीर प्रकाश गडाख वय 37 वर्षे व्यवसाय गडाख मशिनरीज् रा.संगमनेर ता.संगमनेर जि.अहमदनगर हे कोहिनूर कंपनीचे बनावट नाव लावुन कोहिनूर आटा चक्क्या कॉपीराईट अधिकाराचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता स्वतःचे गडाखे मशिनरीज नावाच्या दुकानामध्ये बाळगुन विक्री करीता ठेवलेले असताना मिळुन आला.
पराग शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधीर गडाख या दुकानदारावर कॉपीराईट अँक्ट सन 1957 चे कलम 63,65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख ,जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे