गुन्हेगारीमहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश.

तीन आरोपींकडुन तब्बल ८,७०,००० रुपये किमतीच्या २० मोटारसायकल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

नारायणगाव : ( दि.०९ ) पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या असंख्य घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांनी सदर मोटारसायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्यानुसार नारायणगाव पोस्टे गु.र.नं १०७/२०२१ भादवि कलम ३७९ चा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा, ओतूर तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे किरण पिंपळे याचा शोध घेत असताना आज दिनांक ९/७/२०२१ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय  बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की किरण पिंपळे हा त्याचा साथीदार प्रवीण बाचकर याच्या सोबत चोरीच्या मोटारसायकली घेण्यासाठी आदित्य निकम नावाच्या इसमाकडे रांजनी,ता.आंबेगाव, जि. पुणे गावचे हद्दीत कारफाटा येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या बातमी प्रमाणे रांजनी कारफाटा या ठिकाणी सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर च्या मोटरसायकली सह संशयितरित्या फिरताना आढळून आला. थोड्याच वेळात २ इसम मोटरसायकलींवर त्या ठिकाणी आले व पोलीस पथकाने त्यांना थांबवून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे                  १)किरण भास्कर पिंपळे वय २५,रा. दरडगाव ता. राहुरी,जि. अहमदनगर २)प्रवीण नामदेव बाचकर वय २८ रा. कानगर ता. राहुरी जि. अहमदनगर ३) आदित्य दत्तू निकम वय १९ रा. खोडद,ता. जुन्नर, जि. पुणे असे असल्याचे सांगितले.              त्यातील इसम नामे आदित्य निकम याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचा साथीदार नामे रोहित गुंजाळ व अर्जुन पवार यांच्यासह मिळून पुणे,अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकानांवरून मोटारसायकली चोरी केल्या असून चोरलेल्या गाड्या आम्ही किरण पिंपळे, प्रवीण बाचकर कैलास येळे यांच्याकडे विक्रिस देत होतो.चोरलेल्या मोटारसायकली पैकी काही मोटारसायकली आदित्य निकम याच्या घराजवळ लावल्या असून काही मोटारसायकली किरण पिंपळे, प्रवीण बाचकर,कैलास येळे यांच्याकडे आहेत अशी माहिती दिली.
सदर माहिती वरून पथकाने वरील ठिकाणी जाऊन एकूण ८,७०,००० रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकूण २०मोटारसायकली ताब्यात घेतल्या असून खालील पोलीस स्टेशन मध्ये सदर मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.                                          १) खेड पोस्टे गु.र.नं ३३२/२०२१ भादवि कलम ३७९
२) खेड पोस्टे गु.र.नं
३६२/२०२ भादवि कलम ३७९
३) पारनेर पोस्टे गु.र.नं
१६७/२०२१ भादवि कलम ३७९
४) शिरूर पोस्टे गु.र.नं
४७२/२०२० भादवि कलम ३७९
५) शिरूर पोस्टे गु.र.नं
१४५/२०२१ भादवि कलम ३७९
६) ओतूर पोस्टे गु.र.नं ६५/२०२१ भादवि कलम ३७९
७) यवत पोस्टे गु.र.नं ८६८/२०२० भादवि कलम ३७९
८) आळेफाटा पोस्टे गु.र.नं २२३/२०२१ भादवि कलम ३७९
९) शिरूर पोस्टे गु.र.नं ५२९/२०२१ भादवि कलम ३७९
१०) शिरूर पोस्टे गु.र.नं ४०८/२०२१ भादवि कलम ३७९ तसेच आरोपी किरण भास्कर पिंपळे वय २५,रा. दरडगाव ता. राहुरी,जि. अहमदनगर
हा यापूर्वी १) नारायणगाव पो.स्टे गु र नं १०७/२०२१ भा द वी कलम ३७९,२) नारायणगाव पो. स्टे गु र नं १२१/२०२१ भा द वी कलम ३७९ च्या गुन्ह्यात फरार आहे.
सदर आरोपींकडून ८,७०,०००/- रकमेच्या एकूण २० मोटारसायकल जप्त केल्या असून आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी नारायणगाव पोस्टे च्या ताब्यात दिले आहे.
सदर ची कारवाई ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक  विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नेताजी गंधारे ,नारायणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि पृथ्वीराज ताटे, पोहवा हनुमंत पासलकर,
पोहवा विक्रम तापकीर,पोहवा दिपक साबळे ,पोना संदीप वारे,पोशी अक्षय नवले,पोशि. निलेश सुपेकर,चा पोहवा मुकुंद कदम. पोलीस मित्र प्रसाद पिंगळे,चापोशी दगडू वीरकर तसेच नारायणगाव पोस्टे चे पोना दिनेश साबळे,पोशि. सचिन कोबल यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे