महाराष्ट्र

युनिटी फाउंडेशन व राजुरी ग्रामस्थांकडून चिपळून पूरग्रस्तांना मदत

ग्राहक समाचार : कार्यकारी संपादक – श्री .अमर भागवत

        (दि.२९) : राजुरी ता. जुन्नर येथील युनिटी फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांसकडून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी सव्वाशे किराणा कीटची मदत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या स्वाधीन केली अशी माहिती युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक कणसे व ग्रामस्थ जयसिंग आवटी यांनी दिली.                                          नारायणगाव येथे आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात सव्वाशे किराणा कीटची मदत युनिटी फाउंडेशन राजुरी आणि ग्रामस्थ राजुरी यांच्या वतीने बेनके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी युनिटी फाउंडेशनचे उपाध्यक्ष मुबारक तांबोळी,सचिव रामचंद्र हाडवळे,सचिन काळे, जयसिंग औटी, रईस चौगुले,प्रशांत औटी,गणेश शिंदे,शांताराम हाडवळे,जालिंदर कणसे, कैलास औटी, पांडुरंगऔटी, आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाचे नेते शरदचंद्र पवार  यांच्या आवाहननुसार या मदतीचे संकलन करण्यात येत असून जुन्नर तालुक्यातून राजुरीच्या युनिटी फाउंडेशन आणि ग्रामस्थांनी केलेली ही सर्वात मोठी मदत आहे आणि सर्वांसाठी त्यांनी केलेले हे मदतकार्य प्रेरणादायी आहे असे मनोगत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
या किराणा किटमध्ये साखर, रवा, बेसन, गहूआटा, तेल,सर्व डाळी, पोहे,तांदूळ मीठ, मिरची,हळद,धणा पावडर, साबण, कोलगेट, बिस्कीट इत्यादी सातशे पन्नास रुपये किमतीच्या वस्तू समाविष्ट आहेत.
या मदतीसाठी युनिटी फाऊंडेशनचे निलेश भटेवरा संतोषकुमार आवटे, दीपक कणसे,मंगेश वाघ,सौ. मीनाताई मुंढे यांनी विशेष सहकार्य केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे