गुन्हेगारीमहाराष्ट्र

बोरी खुर्दच्या”पटाडे बापलेक”यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या “महावितरण”चे अधिकारी य वायरमन यांच्यावर “सदोष मान्यष्य वधाचा गुन्हा दाखल

 

ग्राहक ⚖️ समाचार :  कार्यकारी संपादक – श्री.अमर ज्ञानेश्वर भागवत (मोबा.९१३०३४९२९०)बोरी खु.| प्रतिनिधी (दि.३० जुलै )”बोरी खुर्द ता.जुन्नर येथील शेतात महावितरण विजवाहक तारांच्या धक्क्याने पटाडे बापलेकांचा मृत्यू झाला.याला कारणीभूत ठरलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल करावेत अशा मागणीने जोर धरल्याने अखेर गुरुवार(दि.२९ जुलै ) रोजी महावितरणचे शाखा अभियंता,उप कार्यकारी अभियंता,व वायरमन यांचेवर नारायणगाव पोलिस ठाण्यात “सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,बोरी खुर्द शिवारात विजवितरण कंपनीचे वायरमन योगनंद वाडेकर हे शिरोली शाखा अभियंता सतीश मोरे आणि नारायणगाव महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना वेळोवेळी शेतातील विजवाहक तारा तुटल्याने काढून घेण्याबाबत तोंडी व ग्रामपंचायत बोरी खुर्द यांनी लेखी पत्र देऊनसुद्धा त्याचप्रमाणे संबंधित तारांना शेतकरी, शेतमजूर,किंवा जनावरे,किंवा कोणाचाही स्पर्श होऊन मृत्यू होऊ शकतो.हे त्यांना माहीत असतांना देखील त्यांनी त्या कडे दुर्लक्ष केले.                              (दि.२५ जुलै )रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पटाडे मळा येथील शेत जमिन गट नंबर ६०४ मधील ऊसाच्या शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेलेले शेतकरी यादव भिमाजी पटाडे (वय.७०) व श्रीकांत यादव पटाडे (वय ३७) त्याचप्रमाणे महादेव काळे यांचा पाळीव कुत्रा यांना विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यामुळे योगानंद वाडेकर,सतीश मोर व सिद्धार्थ सोनवणे यांनी जाणीवपूर्वक विजेच्या तारा काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे त्यांचे विरुद्ध बापलेकांच्या व काळे यांच्या पाळीव कुत्रा यांचे मरणास कारणीभूत झाल्याच्या कारणावरून नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा र. नंबर १४३/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३०४,३४ कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या दुर्घटनेनंतर आमदार अतुल बेनके यांनी सर्व प्रथम विजवितरण कंपनी विरोधात आवाज उठवला होता.संबधित वायरमन आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींना निलंबित करण्यात येईल.असे सांगितले होते.या शिवाय गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बोरी खुर्द येथील सरपंच सौ.कल्पना वैभव काळे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी शेठ काळे बोरी खुर्द ग्रामस्थ,नारायणगाव सरपंच योगेश पाटे,पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मकरंद पाटे,जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुजित खैरे,विकास दरेकर,गणेश वाजगे आदींनी महावितरणच्या गलथान कारभाराची चौकशी करावी आणि दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नारायणगाव पोलिसांना निवेदन देऊन केली होती.
या गुन्ह्याचा तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,पोलीस उप निरीक्षक सुनीत जी.धनवे ,पो.ना जांभळे आदी करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे