गुन्हेगारीमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक जी.डी.कुचेकर सह अधिकारी व कर्मचारी अखेर निलंबित.

महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मालिन झाल्याने कारवाई

ग्राहक ⚖️ समाचार कार्यकारी संपादक श्री. अमर भागवत


नारायणगाव (दि.३१ जुलै) “राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने  मागील आठवड्यात म्हणजेच शनिवार (दि.२४ जुलै,रविवार दि.२५ रोजी शिरूर,नारायणगाव व पुणे येथे या पथकाने विविध परवाना धारक “बिअरबार आणि परमिट रुम” यांचेवर छापेमारी केली.यात या पथकाला काही त्रुटी आढळल्या या छापेमारीत नारायणगाव येथील राज्य उत्पादक शुल्क कार्यालयातील बिट अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्तव्य पारायनता राखली नाही. त्यामुळे शासनाची प्रतिमा मालिन झाली असा ठपका ठेवून वरिष्ठांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित केले असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्कच्या भरारी पथकाने शनिवार दि.२४ व रविवार दि.२५ जुलै रोजी पुणे,शिरूर व नारायणगाव येथील विविध परवानाधारक परमिटरूम आणि बिअरबार या दुकानांवर राज्यउत्पादन शुल्कच्या “भरारी पथकाने” छापेमारी” केली.यात शिरूर तालुक्यातील हॉटेल आर.जी.मलठण ,हॉटेल आयुष रांजणगाव ,मे.हॉटेल पल्लवी रांजणगाव ,हॉटेल जयभवानी या शिरूर तालुक्यातील परवानाधारक बिअरबार आणि परमिट रूमवर छापा टाकला असता वाहतूक परवाना नसलेल्या विदेशी मद्याचे १९६ आणि बियरचे१६७ बॉक्स मिळून आले.
जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे दीपक परमिटरुम.येथे विना वाहतूक पास विविध ब्रँड/साईजचे १२ बॉक्स आढळुन आले. नारायणगाव येथील हॉटेल पूनम येथील पर्मिटरुम या परवानाधारक हॉटेलमध्ये विनावाहतुक पास विविध ब्रॅण्डचे १८० मिली.१४८ बाटल्या.९० मिली क्षमतेच्या २० बाटल्या.व स्ट्राँग बियर ६५० मिली क्षमतेच्या २० बाटल्या.मिळून आल्या.मे.कपिल परमिट रूम येथे विना वाहतूक परवाना विविध ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या १४४ बाटल्या(३ बॉक्स), बियर ६५० मिली.व ३३०मिली. क्षमतेच्या ४८ बाटल्या(४ बॉक्स),व बियरबारच्या ११ बाटल्या इतका मद्य साठा मिळून आला.
नारायणगाव येथील प्रशांत बियरबारच्या परवानाधारकाने निरीक्षणावेळी हिशोबाच्या नोंदवह्या.परिवहन पास आणि शेरे पुस्तक,परवाना प्रत,मंजूर नकाशा दाखल करू शकलेले नाहीत.असा ठपका ठेवण्यात आला आहे.
यात शिरूर आणि जुन्नर नारायणगाव येथील वरील परवानाधारक परमिटरूम आणि बिअरबार या अस्थापनांवर भरारी पथकाने अचानक छापा टाकून तपासणी केली असता,”एफएल–३ या परवाना धारक परमिटरुम निरीक्षणात भरारी पथकाला विना वाहतूकपास मद्यसाठा मिळून आलेला आहे.ही नियमन करण्याची जबाबदारी नारायणगाव येथील निरीक्षक जी.डी. कुचेकर,दुय्यम निरीक्षक ए.ई.तातळे,जवान विजय घुंदरे,आणि दिलीप केकरे यांनी हे परमिटरुमचे गुन्हे उघडकीस आणले नाहीत.असे निरीक्षण भरारी पथकाला आढळून आले आहे.                                त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला असून,महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मालिन झाली आहे.भरारी पथकाने दिलेल्या सूचनेनुसार कोणतीही कारवाई स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पारायणता राखली नाही असा ठपका ठेवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे