गुन्हेगारीमहाराष्ट्र

मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील आळेफाटा (ता. जुन्नर) व शिरूर पोलिस ठाण्यात मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या व जंगल व डोंगराळ भागात लपून रहात असलेल्या कुख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेल्हे (ता.जुन्नर) येथील आळकुटी फाट्यावर सापळा लावून सिनेस्टाईल ने पकडले.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले वय ४५ वर्ष रा. निघोज,ता पारनेर, जि. अ. नगर असे आहे.
सदर गुन्ह्यांतील निष्पन्न आरोपी हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. तो जंगल व डोंगराळ भागात राहत असल्याने तो सहजा सहजी मिळणे शक्य होत नव्हते. या फरार आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपी ची माहिती घेण्याकरीता वेष बदलून त्याच्या ठाव ठिकाणा बाबत माहिती घेऊन त्याची माहिती देणारे बातमीदार नेमून त्यांच्या मार्फत पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी बाळू झारू भोसले हा बेल्हे येथे अळकुटी फाट्यावर येणार आहे. लागलीच त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीस ताब्यात घेतले.व त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले रा.निघोज ता. पारनेर, जि. अ.नगर असे सांगितले.
सदर आरोपीवर १)आळेफाटा पोस्टे गु.र.नं ४३०/२०२० भादवि कलम ३९५,३९७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ कलम३(१) व २)शिरूर पोस्टे गु.र.नं ६५६/२०१७ भादवि कलम ३९५ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ कलम३(१) असे गुन्हे दाखल असल्याने आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील तपासा करीता आळेफाटा पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
दि. १४/१२/२०२० रोजी सागर सुरेश खराडे (वय वर्ष 30) राहणार खराडे मळा मंगरुळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे त्यांच्या राहत्या घरात झोपले असताना अनोळखी सात इसम आरोपी यांनी फिर्यादी यांचे घराला बाहेरून दरवाज्याला कडी लावून त्यांचे आई-वडील झोपलेल्या मधल्या खोलीचा दरवाजाचे बाहेरील कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून त्यांचे घरातील ५ हजार रुपये रोख रक्कम तसेच फिर्यादी यांचे आई यांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरीने लोखंडी पाईप व लाकडी दांडके यांचा धाक दाखवून मारहाण करून चोरून नेले होते. वगैरे मजकुरावरून आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील हा आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नेताजी गंधारे,पो. हवा. दिपक साबळे,पो. हवा. हनुमंत पासलकर,पो.हवा. विक्रम तापकिर,पो. ना. संदिप वारे,पो. कॉ. अक्षय नवले,पो. कॉ निलेश सुपेकर,पो. कॉ. दगडू वीरकर यांनी केली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे