गुन्हेगारीमहाराष्ट्र

ओझर येथे भरवस्तीत दरोडा ! वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला ! ८ ते ९ तोळे सोने केले लंपास !

           ओझर : जुन्नर तालुक्यातील श्री. श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ओझर या गावात भरवस्तीमध्ये राहणाऱ्या शांताबाई बळवंत कवडे (वय ७०) व बळवंत बाबुराव कवडे (वय ७५) या वृद्ध जोडप्यावर बुधवार दि. २५ रोजी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन ते चार जणांनी घरात घुसून सशस्त्र हल्ला केला.

     ओतुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार
या घटनेमध्ये बळवंत कवडे यांना घरामध्ये बांधून ठेवून त्यांची पत्नी शांताबाई कवडे यांच्या गळ्यातील व अंगावरील सुमारे आठ ते नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.
यावेळी बळवंत कवडे यांनी आरडाओरडा केल्याने त्यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना जबर जखमी केले.

           या हल्ल्यात बळवंत कवडे यांच्या डोक्याला व खांद्याला दुखापत झाली आहे.
अशाप्रकारे भर वस्तीमध्ये एका वृद्ध दाम्पत्यावर शेजारी पाजारी लोक जागे असताना हल्ला होणे म्हणजे ही चिंतेची बाब बनली आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
या घटनेचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे